भुसावळातील जखमी शरीर सौष्ठवपटूचा उपचारादरम्यान मृत्यू

दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून 18 संशयीतांनी केला होता हल्ला


Injured gym trainer in Bhusawal dies during treatment भुसावळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून खुन्नस ठेवून शहरातील  शरीर सौष्ठवपटूवर ठार करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री 8.50 वाजेच्या खडका रोडवरील अलिया कोल्डींक्सच्या दुकानात घडली होती. या घटनेत अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) हा जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान तरुणाची प्राणज्योत मालवली.

जुन्या वादातून केला प्राणघातक हल्ला
अफाफ पटेल या शरीर सौष्ठवपटूवर दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाची खुन्नस ठेवून शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पटेल यांना उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी रोमान शेख शकील, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज, लतीफ तडवी, दानिश शेख फरीद, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मील शेख फरीद, तोहीद शेख नासीर शेख, अबुजर शेख बशीर, मुस्तफा शाह युनुस शाह, नासिर सन्नाटा, इम्मू कोलरीया, कल्लू तडवी आणि अक्रम शेख सबदर शेख, कलीम उंद्री व शरीफ उंद्री यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !