शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग
The teacher himself molested the minor student चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सुनील संतोष भागवत याने आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यर्थिनीचा विनयभंग केल्याची घटना 15 जानेवारी ते 4 फेबु्रवारीदरम्यान घडली. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फोनवरही केले अश्लील संभाषण
चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत 13 वर्षीय अल्पवयीन पीडीता आठवी वर्गात् शिक्षण घेते. याच गावातील शाळेत संशयित सुनील संतोष भागवत हा शिक्षक म्हणून सेवेस आहे. आरोपीने पीडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडीतेसोबत वैयक्तीक संबंध प्रस्तापित करण्याच्या वाईट उद्देशाने पीडीतेच्या आईचा नंबरवर 15 जानेवारी ते आज पावेतो वेळोवेळी फोन करून अश्लील संभाषण केले तसेच शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास पिडीता शाळेत एकटी असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. या प्रकरणी शिक्षक सुनील भागवत विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.








