धरणगावातून मालवाहू पिकअप व्हॅन लांबवली
Cargo pick-up van extended from Dharangaon धरणगाव : शहरातील वैभव नगर परीसरातून घरासमोर लावलेली मालवाहू पिकअप व्हॅन चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
सचिन मधुकर पाटील (रा.गुजराथी गल्ली) यांच्याकडील महेंद्रा मालवाहू पिकअप व्हॅन (क्र. एम.एच.19 एस. 7399) ही 8 रोजी वैभव नगर परिसरात राहणार्या आपल्या बहिणीच्या घराबाहेर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री साधारण दीड वाजेच्या सुमारास संधी साधली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहेत.








