यावल पोलिसांनी रोखली गुरांची कत्तल : चौकडीविरोधात गुन्हा
सात गुरांची पोलिसांनी सुटका करीत केली गो शाळेत रवानगी
Yawal Police Stops Cattle Slaughter : Crime Against Quartet यावल : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुरांची कत्तल होण्यापूर्वीच सात गुरांची सुटका केली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार, 9 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोळवद शिवारातील हडकाई नदीनजीक ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल तालुक्यातील कोळवद गावाच्या नजीक असलेल्या खडकाई नदीच्या पात्रानजीक संशयित गायींची कत्तल करणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस हेड कॉन्स्टेबल बालक बार्हे, भूषण चव्हाण, अनिल साळुंखे आणि गणेश ढाकणे यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गुरे घेऊन जाणार्या संशयित आरोपी शराफत अली आशिक अली (53) आणि शोएब शराफत अली (18, दोन्ही रा.मारूळ) यांना हटकले असता त्यांनी ही गुरे जाकीर कुरेशी आणि इब्राहिम कुरेशी (दोन्ही रा.यावल) यांच्या मालकीचे असून यावल शहरात कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली. यावल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुरांची सुटका करीत त्यांची निगमावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली.






यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शराफत अली आशिक अली, शोएब अली शराफत अली (दोन्ही रा. ारूळ), जाकीर कुरेशी आणि इब्राहिम कुरेशी (दोन्ही रा.यावल) यांच्या विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.


