शिंदे-फडणवीस सरकारचा मोहित कंबोज यांना मोठा दिलासा : अनधिकृत बांधकाम केले नियमित


Shinde-Fadnavis government’s relief to Mohit Kamboj : Unauthorized construction in four flats made regular मुंबई : शिंदे-फडणवणीस सरकारने भाजप नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा दिला असून त्यांच्या सांताक्रुझमधील चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी खास बाब म्हणून निर्णय घेत दिली आहे. विशेष म्हणजे इतर प्रकरणांमध्ये हे उदाहरण म्हणून मानले जाऊ नये, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

ठाकरे सरकारच्या काळात बजावली होती नोटीस
काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती. कंबोज यांनी आपल्या घरात आणि कार्यालयाच्या बांधकामात काही बदल केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. मोहीत कंबोज यांच्या घराची, इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती.

नगरविकास विभागाकडे केले होते अपिल
महाविकास आघाडीचे सरकार असताना मोहीत कंबोज यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. मात्र काही महिन्यातच सरकार बदलले. त्यानुसार राज्यात शिंदे-फडणवीसांच्या युतीचे सरकार आल्यानंतर आता मोहीत कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येत आहे. कंबोज यांनी यासाठी नगरविकास खात्याकडे अपील केले होते.

याआधीही आर्थिक घोटाळ्यात क्लीन चीट
भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 2011 ते 2015 दरम्यान 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती, त्यासाठी वापरली गेली नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. डिसेंबर 2022 मध्ये मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात क्लीन चीट दिली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !