जळगावात अत्याचारातून अल्पवयीन पिडीतेने दिला बाळाला जन्म : नराधमाला बेड्या


In Jalgaon, minor victim of torture gave birth to a baby  जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर वारवांर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिली असून तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाचे आमिषाने केला अत्याचार
साडेसतरा वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2019 ते जानेवारी 2023 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवत संशयित आरोपीने पिडीतेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मुख्य संशयीत आरोपीच्या सांगण्यावरुन इतर तिघांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली.







यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी अनिस शरीफ भिस्ती, फिरोजा शरीफ भिस्ती, मेहजमीन रईस भिस्ती, अन्वरखान (सर्व रा.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे करत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !