भुसावळात विवाह सोहळ्यादरम्यान चोरी करताना परप्रांतीय भामटे जाळ्यात


Migrant Bhamte nabbed while stealing during marriage ceremony in Bhusawal भुसावळ : शहरातील बालाजी लॉनमधून दोन दिवसांपूर्वी दोन लाख नऊ हजारांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा लग्नातील गर्दीचा फायदा घेत परप्रांतीय भामट्यांनी पैशांची पाकिटे लांबवण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस येताच त्यांना चोप देवून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता
बालाजी लॉनमध्ये बुधवारी आयोजित लग्न समारंभात कोट घातलेल्या एका तरुणासोबत अल्पवयीन मुलगाही होता. उभयंतांवर नवयुवक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी लक्ष ठेवले व व्यासपीठावर गर्दी होताच अल्पवयीन मुलाने व्यासपीठावरील वधू-वरांच्या मागे भेटवस्तू दाखल मिळालेल्या पाकिटांची पिशवी उचलूून कोट घातलेल्या तरुणाकडे दिली व याचवेळी दोघांना पकडण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकाराने दोघे घाबरले व दोघांना चांगलाच चोप देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी तत्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतरपोलीस निरीक्षक राहूल गायकवाड व सहकार्‍यांनी धाव घेतली. तरुणासह अल्पवयीन मुलास चौकशीकामी आणण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !