भुसावळातील बॉडी बिल्डरचा मृत्यू : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Death of body builder in BhusawaL : Cremation in mournful atmosphere भुसावळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून खुन्नस ठेवून शहरातील जीम ट्रेनर तथा बॉडी बिल्डर असलेल्या तरुणाला ठार करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला शनिवारी रात्री 8.50 वाजेच्या सुमारास खडका रोडवरील अलिया कोल्डींक्स या दुकानात करण्यात आला होता. या घटनेत जखमी झालेल्या अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) या तरुणाचा बुधवारी रात्री खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुन्या वादातून केला प्राणघातक हल्ला
जीम ट्रेनर वजा बॉडी बिल्डर असलेल्या अफाफ पटेलवर दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाची खुन्नस ठेवून गत शनिवारी रात्री 18 संशयितांनी संगनमताने प्राणघातक हल्ला केला होता. पटेल यांना उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, खून प्रकरणी यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






यांच्या विरोधात दाखल आहे गुन्हा
हल्ल्याप्रकरणी रोमान शेख शकील, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज, लतीफ तडवी, दानिश शेख फरीद, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मील शेख फरीद, तोहीद शेख नासीर शेख, अबुजर शेख बशीर, मुस्तफा शाह युनुस शाह, नासिर सन्नाटा, इम्मू कोलरीया, कल्लू तडवी आणि अक्रम शेख सबदर शेख, कलीम उंद्री व शरीफ उंद्री यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


