चोपडा तालुक्यात खळबळ : दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार : तरुणांना अटक


Excitement in Chopra taluka : Rape of two minor girls : Youth arrested चोपडा : शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना चोपडा तालुक्यात उघडकीस आली असून या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतात व महाविद्यालयात केला अत्याचार
पहिल्या घटनेतील पीडीता तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून संशयित विलास सुभाष भील (20) याने पीडीता अल्पवयीन असताना तिच्या लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर एका महाविद्यालयात 31 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अत्याचार केला
तसेच मे, जून व डिसेंबर 2022 जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान केळीच्या शेतातही अत्याचार करण्यात आला व पीडीतेसोबत असलेले फोटो हे इंस्टाग्रामवर प्रसारीत करून बदनामी केली. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत. संशयित आरोपीला अटक करण्यात आली.







प्रेमसंबंधातून अत्याचार व फोटोही केले व्हायरल
दुसर्‍या घटनेत पीडीता ही एका गावातील रहिवासी असून संशयित समीर सलीम पिंजारी (22) याने पिडीतेसोबत 6 जानेवारी 2022 ते 13 डिसेंबर 2022 दरम्यान प्रेमसंबंध निर्माण करून एका शेतात पीडीता अल्पवयीन असतानाही तिच्यावर अत्याचार केला तसेच पीडीतेने प्रेम संबंध ठेवण्यास नंतर नकार दिल्यावर समीरने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून समीर पिंजारी याच्या विरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली असून तपास सहा.पोलिस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !