आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या नावाखाली जळगावच्या नोकरदाराला सहा लाखांचा गंडा


Pretending to be an IPS officer: Jalgaon employee extorted 6 lakhs in the name of viral video जळगाव : अश्लिल व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल झाला असून तो डिलीट करण्यासह कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून जळगावातील नोकरदाराला सुमारे सहा लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच लाख 81 हजारांचा गंडा
53 वर्षीय तक्रारदार हे नोकरदार असून जळगावच्या गिरणा पंपीग परीसरात वास्तव्यास आहेत. त्यांना व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पलीकडून अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या व्हिडिओ कॉलमुळे त्यांच्याही काम भावना जागृत करून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला व हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला असून तो डिलीट करण्यासह कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आयपीएस प्रेमप्रकाश, रूपा मंजीत सिंग नामक सांगणार्‍या संशयीतांनी पाच लाख 81 हजार 80 रुपयांची खंडणी वेळोवेळी उकळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसात धाव घेत गुरुवारी तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !