कार पंक्चर झाली अन् चोरट्यांनी साधली संधी : जळगावात कारमधून दिड लाखांची रोकड लांबवली


The car got punctured and the thieves took the opportunity: cash of half a lakh was stolen from the car in Jalgaon जळगाव : कार पंक्चर झाल्यानंतर चाक बदलत असतानाच मेडिकल व्यावसायीकाची सीटवर ठेवलेली दिड लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार शहरातील सागर पार्क समोरील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री आठ वाजता घडला. या प्रकरणी गुरूवारी रोजी रात्री उशीरा रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
मेडिकल व्यावसायीक कनकमल उत्तमचंद राका (68, हॉटेल रॉयल पॅलेसमागे जय नगर, जळगाव) हे बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घरी जात असतांना त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाल्याने ते सागर पार्कसमोरील पेट्रोल पंपाजवळ पंक्चर काढण्यासाठी आले असता त्यांनी कारच्या मागच्या सीटवर दीड लाख रूपये असलेली पिशवी ठेवली. पंक्चर काढत असताना चोरट्यांनी संधी साधत ीटवरून दीड लाखांची रोकड लांबवली. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर राका यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !