पाळधीतील वृद्धाचा मृत्यू : वाहनधारकाविरोधात गुन्हा
Death of elderly in custody : Crime against driver धरणगाव : पाळधी शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर शेता पिकांना पाणी देण्यासाठी पायी निघालेल्या निंबा पूंजू धनगर (60) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी गुरूवारी सायंकाळी अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात वाहनधारकाचा शोध
धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील निंबा पूंजू धनगर (60) हे 28 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी पायी मार्गाने राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने जखमी अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले होते. अपघात प्रकरणी मयत निंबा धनगर यांच्या मुलगा प्रमोद निंबा धनगर यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी रात्री अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश भालेराव करीत आहे.








