पतंजली योग पीठाद्वारे उपचाराच्या नावाखाली तरुणाला 55 हजारांचा गंडा


55 thousand to the youth in the name of treatment by Patanjali Yoga Peetha जळगाव : पतंजली योग पीठाद्वारे उपचाराच्या नावाखाली जळगावातील तरुणाला 55 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्यात

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पंकज सुभाष काळे (36, अयोध्या, नगर, जळगाव) हे परीवारासह वास्तव्याला असून बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ते घरी असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला व संबंधिताने माझी पतंजली योगपीठ ट्रस्ट येथे ओळख असल्याने तिथे माझ्या माध्यमातून उपचार करून देतो. त्यावर पंकज काळे यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी एकुण 54 हजार 600 रूपये ऑनलाईन मागून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज काळे यांनी एमआयडीसी पोलिसात गुरुवारी रात्री 9 वाजता तक्रार दिल्याने अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !