अट्रावलला बकर्या चारण्याच्या कारणावरून एकाला मारहाण :
Man beaten up for feeding goats to Atraval यावल : तालुक्यातील अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिराजवळ बकर्या चरण्याच्या कारणावरून तरुणाला एकाने मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्षुल्लक कारणावरून मारहाण
अट्रावल, ता.यावल येथील शुभम प्रदीप सपकाळे (22)( या तरुणाने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिरच्या जवळ बकर्या चरण्याच्या कारण्यावरून किरण पुरुषोत्तम कोळी (अट्रावल) यांनी लाकडी दांड्याने त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून दुखापत केली व त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.








