चोपड्यात कापड दुकानाला आग : तरुणाचा होरपळून मृत्यू
Fire at a cloth shop in Chopda : A young man died चोपडा : कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत गौरव सुरेश राखेचा (30) या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर सुदैवाने कुटूंब बचावले. आगीची ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास आग
चोपडा शहरातील मेन रोडवरील राहुल एम्पोरीयम या दुकानात शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले तर या आगीतून कुटुंबातील सदस्यांना बचावण्यात यश आले असलेतरी गौरव राखेचा (30) या तरुणाचा मात्र मृत्यू ओढवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.








