शेंदुर्णीत धाडसी घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Shendurni :  1.5 lakhs instead of lumpas पहूर : तालुक्यातील शेंदुर्णी येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत सुमारे दिड लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
जोगेश्वर अनिल अग्रवाल (35) हे व्यावसायीक परकोट गल्लीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 8 ते 10 दरम्यान कुटूंब लग्नासाठी पाचोरा येथे बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. गच्चीवरील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून सुमारे दिड लाखांचा ऐवज लांबवला. अग्रवाल कुटूंब लग्नाहून परत आल्यानंतर घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !