कोळन्हावीनजीक भीषण अपघातात दोघे मित्र जागीच ठार


Two friends died on the spot in a horrific accident near Kolnahvi डांभूर्णी : तालुक्यातील कोळन्हावीनजीक डंपर आणि दुचाकीचा अपघात होवून त्यात सावखेडासीम येथील रहिवासी व हल्ली जळगावस्थित तरुणाचा मृत्यू झाला तर सहकारी मित्र जखमी झाला होता मात्र त्याचीदेखील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ईस्माईल हबीब तडवी (30, रा.सावखेडासीम) असे मयताचे नाव असून त्याच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डंपरच्या धडकेने दोघा तरुणांचा ओढवला मृत्यू
जळगावातील सुप्रीम कॉलनीत यअमोल पाटील हा कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी सायंकाळी अमोल हा त्याचा सावखेडासीम येथील मित्र ईस्माईल हबीब तडवीसोबत दुचाकी (एम.एच.19 डी.बी 2746) ने यावल येथे जात असताना डांभूर्णी गावाजवळील कोळन्हावी फाट्याजवळ डंपर (एम.एच.19 बी.डी. 3468) ने अमोलच्या दुचाकीला धडक दिल्याने अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर ईस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री 12 वाजेनंतर त्याचीही जिल्हा रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मयत तडवी याच्यावर सावखेडासीम येथे अंतसंस्कार करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !