बोदवडमधील फर्निचर व्यावसायीकाची रेल्वेखाली आत्महत्या


A furniture dealer in Bodwad committed suicide under the train बोदवड : शहरातील शारदा कॉलनीतील रहिवासी तथा सी.एम.फर्निचरचे मालक चंद्रकांत महादेव पाटील (30) यांनी शनिवार, 11 रोजी सकाळी दहाच्या सुमारास भुसावळ-नागपूर मार्गावरील उजनी शिवार येथील खांब क्रमांक 468/41/43 दरम्यान धावत्या मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रेल्वे कर्मचारी ललितकुमार शिवकुमार कौशीक यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात मुलगा व दोन मुली तथा आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ याच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अयुब तडवी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !