सुरत पॅसेंजरमध्ये प्रवाशाला मारहाण करीत लुटले : जळगावातील त्रिकूट जाळ्यात
नंदुरबार : नंदुरबार लोहमार्ग पोलिसांनी पाळधी -जळगावदरम्यान सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये प्रवासी प्रकाश वामन पाटील (43, रा.वेलसवाडी, ता मुक्ताईनगर, जि.जळगाव) यांना मारहाण करीत लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जळगावातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
या आरोपींना अटक
संशयित जुबेर उर्फ डबल शेख भिकन (22, रा.गेंदालाल मिल, जळगाव), तन्वीर उर्फ तन्नु रहीम शेख (21, रा. शिवाजीनगर, जळगाव), फारूख शाह नुर मोहमद फकिर (22, रा. दुध फेडरेशन, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 17 हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड, मतदान कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, टोळीतील अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.






यांनी आवळल्या मुसक्या
गुन्हा अन्वेषण पथकातील एपीआय रमेश वावरे, संजय पाटील, किरण बोरसे, जयकुमार कोळी, पनितीन पाटील, राजेश घोराडे, जितेंद्र चौधरी तसेच भुसावळ लोहमार्ग निरीक्षक विजय घरेडे, एपीआय भाऊसाहेब मगर, जगदीश ठाकुर, अजीत तडवी, धनराज लुले, दिवाणसिंग राजपुत, सागर खंडरे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अमळनेर निरीक्षक कुमार श्रीकेश, कुलभूषणसिंह चौहाण, नंदू पाटील, सुभाषसिंह, सीआयबी सुरतचे भुपसिंह मान, परेश ठाकूर आदींनी आरोपींना अटक केली.


