Ramesh Bais new governor भगतसिंग कोश्यारींचा अखेर महाराष्ट्राला गुडबाय : रमेश बैस नवे राज्यपाल


Ramesh Bais new governor मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेला पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैस यांना आता महाराष्ट्राची जवाबदारी देण्यासत आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल झाले आहेत.

कोश्यारींच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी
थोरपुरूषांसह अनेक वाद-विवाद निर्माण करणारे वक्तव्य करून कोश्यारी यांनी नाराजी ओढवून घेतली होती शिवाय विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात अनेक महिन्यांपासून आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
एल गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !