जळगावातील अनुराग स्टेट बँक कॉलनी घरफोडी
Anurag State Bank Colony Burglary in Jalgaon जळगाव : शहरातील रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीतील अनुराग स्टेट बँक कॉलनीत चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत लॅपटॉपसह अन्य साहित्य मिळून 22 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत आनंद कमलकिशोर भंडारी हे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करतात. त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने ते 29 जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणनगाव येथे गेले होते. ही संधी चोरट्यांनी साधत 8 ते 9 दरम्यान घरफोडी केली. शुक्रवार,10 फेब्रुवारी रोजी भंडारी हे जळगावात आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी लॅपटॉप, हार्डडिस्क, साऊंड सिस्टीम, वायफाय डोंगल असा एकूण 22 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी भंडारी यांच्या तक्रारीवरून रामानंद पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.








