जळगावच्या आसावा नगरात सव्वा लाखांची घरफोडी


Burglary worth half a lakh in Asawa town of Jalgaon जळगाव : शहरात चोर्‍यांसह घरफोड्यांचे सत्र कायम असून आसावा नगरातही घरफोडी झाल्याची बाब शुक्रवारी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घररून एक लाख 13 हजारांचा ऐवज लांबवला असून या प्रकरणी रामानंदनगर

पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला
आसावा नगरात पुरूषोत्तम नथ्थू वाणी (58) राहतात. शुक्रवारी पुरूषोत्तम हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दोन मंगळसूत्र, कानातले, सोन्याचे तुकडे, चांदीचे दोन वाळे, तीन चांदीच्या साकळ्या असा एकूण 1 लाख 13 हजारांचा ऐवज लांबवला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुरुषोत्तम वाणी घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !