राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर भुसावळात पेढ्यांचे वाटप अन् जल्लोष
After the resignation of Governor Bhagat Singh Koshyari, distribution of cows and jubilation in Bhusawal भुसावळ : महाराष्ट्राच्या भूमीला बदनाम करणार्या व छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतीबा फुले सावित्रीबाई फुले व महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत फटाके फोडून व पेढे वाटून रविवारी आनंदोत्सव साजरा केला.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण ,तालुका कार्याध्यक्ष अनिस लोधी, शहर कार्याध्यक्ष विशाल ठोके, शहर उपाध्यक्ष राहुल वाघ, तुषार चौधरी, प्रवीण पवार, निलेश जाधव, सलीम तडवी, रुपेश बाविस्कर, सिद्धार्थ पगारे, संजय पाटील, मयूर मेढे, कृष्णा काके, मयूर जोशी, अमित सोनवणे, प्रमोद वाघ, सागर पाटील, अमोल मांडे, गौरव नन्नवरे आदींची उपस्थिती होती.
