कंडारीत जुन्या वादातून एकावर कुर्हाडीने हल्ला
An ax attack on one from an old dispute in Kandari भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून एकावर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
किशोर लक्ष्मण सोनवणे (48, सम्राट कॉलनी, कंडारी) यांच्या तक्रारीनुसार, संशयित संजय रमेशचंद्र कौशल (39, सम्राट कॉलनी, कंडारी) याने शनिवारी सकाळी 11 वाजता जुन्या वादाच्या कारणावरून कुर्हाड डोक्यात मारली तसेच डाव्या पंजावर मारली तसेच त्यांच्या पत्नीला शिविगाळ केली. तपास नाईक सोपान पाटील करीत आहेत.








