पष्टाणेतील दुध विक्रेत्याला बेदम मारहाण : धरणगावच्या दोघांविरोधात गुन्हा
धरणगाव : तालुक्यातील पष्टाणे येथील दुध विक्री करणार्या व्यावसायीकास किरकोळ कारणावरून दोघांनी बेदम मारहाण करीत डोक्यात लोखंडी पाईप टाकून दुखापत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
पष्टाणेतील दुध व्यावसायीक चुडामण शामराव पाटील (62) यांच्या तक्रारीनुसार, शनिवार, 11 रोजी रात्री 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातळील अमृत दुध डेअरीसमोर संशयीतांनी तुम्ही खेड्या-पाड्यावरून दुध विक घेवून विकू नका, असे सांगितले असता पाटील यांनी त्यास नकार दिल्याने संशयित राहुल विजय पाटील व मयूर विजय पाटील (मराठा गल्ली, धरणगाव) यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकण्यात आल्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.








