भुसावळात विधवा, घटस्फोटीत, विधुर, प्रौढ, अपंगांसाठी 2 एप्रिलला परीचय मेळावा
भुसावळ : घटस्फोटीत, विधवा, विधुर, प्रौढ, अपंग, शेतकरी व व्यावसायीक यांचा पुनर्विवाह इच्छुक युवक- युवतीसाठी 11 व्या परीचय मेळाव्याचे आयोजन भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे शाखा विभाग भुसावळतर्फे रविवार, 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता संतोषी माता हॉल मध्ये करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी यंदा जिल्ह्याबाहेरील इच्छुक लोकांनी नावे नोंदण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यात एक माध्यम म्हणून सूचीचे प्रकाशन केले जाणार आहे.
इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन
इच्छुकांनी भोरगाव लेवा पंचायत कार्यालय, पुरुषोत्तम मेडिकल, पांडुरंग टॉकीज समोर मामा पाचपांडे पान सेंटर येथे नावे नोंदवावी, असे आवाहन भोररगाव लेवा पंचायतच्या उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी कळविले आहे. या मेळाव्यापर्यंत पुनर्विवाह इच्छुकांचे लग्न जमल्यास संस्थेतर्फे वैदिक पद्धतीने लग्न लावण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारलेी आहे. कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात येत आहे.
