न्हावी येथे नामसंकीर्तन सप्ताहाला सुरूवात
न्हावी : गावातील महादेव मंदिर संस्थान विश्वस्त मंडळ व गावकर्यांच्या वतींने महाशिवरात्री पर्वानिमित्त श्री शिवमहापुराण सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वक्ता श्री शास्त्री मानसप्रकाशदासजी यांच्या अमृततुल्य वाणीतून कथेचे वाचन सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 वेळात होत आहे.
यांची होणार कीर्तने
सप्ताहात 14 रोजी हभप चंद्रकांत महाराज (साकरी), 15 रोजी दीपक महाराज (शेळगाव), 16 रोजी भरत महाराज (म्हैसवाडी) यांचे रात्री 8 ते 10 वेळेत कीर्तन होणार आहे. 17 रोजी रात्री 8 ते 10 प.पू. स्वरूपानांदजी महाराज (श्री पंत मंदिर, आनंदवन, श्री क्षेत्र डोंगरदे) यांचे प्रवचन तर शनिवार , 18 रोजी भजन व शिवनाम जागरण तसेच रविवार, 19 सकाळी 8 ते 10 हभप जितेश महाराज, म्हसावद यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर 10 ते 1 महाप्रसादाचे वाटप होईल. पंच क्रोशीतील भक्तांनी महाशिवरात्री पर्वानिमित्त श्री शिवमहापुराण सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण, नामसंकीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर संस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

