देवेंद्र फडणवीस असे स्टेटमेंट करतील असे कधी वाटले नाही : शरद पवार


Never thought that Devendra Fadnavis would make such a statement: Sharad Pawar मुंबई : पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करूनच घेण्यात आल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर खळबळ उडाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत, सुज्ञ माणूस आहे, असत्याचा आधार घेवून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असे वाटले नाही, असे ते म्हणाले आहेत.

निवडणुकीच्या तोंडावरच साक्षात्कार कसा?
अशोक चव्हाण म्हणाले की, कसबा, चिंचवड पोटनिवडणूक समोर आहे त्यामुळे भाजपला यश प्राप्तीसाठी अशी विधाने करण्याची वेळ आली आहे. आमचा प्रचार जोरकस पातळीवर सुरू आहे. मला वाटते यात शरद पवार यांचा उल्लेख झाला म्हणून मी प्रतिक्रीया दिली. अजित पवारांचा उल्लेख झाला असता तर ते प्रतिक्रीया पुण्यात देऊ शकतात. पुण्यात स्थानिक नेतृत्वात सामर्थ नसल्याने भाजपचे लोक अशा गौेप्यस्फोटाचा आधार घेत आहेत.

राष्ट्रवादीचा आम्हाला प्रस्ताव आला होता : फडणवीस
फडणवीसांनी गौप्यस्फोट केला की, ”आम्ही निवडून आल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. तेव्हा ते काँग्रेस आणि एनसीपीसोबत सत्तास्थापन करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले. आम्ही काँग्रेससोबत जावू शकत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळीही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता.”


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !