जळगावात अल्पवयीन विद्यार्थ्यावर चाकूहल्ला


Knife attack on minor student in Jalgaon जळगाव : दुचाकी लावण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सजवळ सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावात गुन्हेगारी बोकाळली
तक्रारदार आर्यन अजय पाटील (16, रा.दांडेकर नगर, जळगाव) हा विद्यार्थी शहरातील काशिनाथ पलोड या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. सोमवारी सायंकाळी सहा वाजता आर्यन दुचाकीने खाजगी क्लाससाठी मित्र सोहम इखनकर याला घेण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मिनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आला असता तेथे तीन ते चार संशयित उभे असताना त्यांनी इथे दुचाकी लावू नको, असे सांगत वाद घालून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच एकाने पाठीत चाकूने वार केला व नंतर संशयित पसार झाले. आर्यनच्या मित्रांनी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवले.
या प्रकरणी आर्यनने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !