वाकडी गावात चोरटे शिरजोर :दोन दुकानांमध्ये चोरी
37 हजारांचा मुद्देमाल लांबवला : व्यापार्यांमध्ये घबराट
Thieves in Wakadi village : Theft between two shops जामनेर : तालुक्यातील वाकडी गावातील तोंडापूर रस्त्यावरील दोन दुकानांना चोरट्यांनी टार्गेट करीत 36 हजार 970 रुपयांची रोकड लांबवल्याने व्यापार्यांमध्ये खळबह उडाली आहे. या प्रकरणी सोमवार, 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यापार्यांच्या गोटात खळबळ
वाकडी येथील अभय भगचंद जैन यांचे वाकडी येथे तोंडापूर रस्त्यावर अरीहंत अॅग्रो नामक दुकान असून कृषी साहित्याचे ते विक्री करतात. चोरट्यांनी 8 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रात्री संधी साधत दुकानाच्या शटरची पट्टी तोडून 470 रुपयांची चिल्लर तसेच 15 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली तसेच दुकानाच्या शेजारी असलेल्या भरतसिंग राजपूत यांचया राधा ट्रेंडींगमधील 21 हजारांची रोकड असा एकूण 36 हजार 970 रुपयांची रोकड लांबवल्याने गावात खळबळ उडाली. या प्रकरणी अभय जैन यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरोधता पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किरण शिंपी करीत आहे.

