हुबळी एक्स्प्रेसमधून 30 हजारांचा मोबाईल लांबवला
30,000 mobile phone was stolen from Hubli Express भुसावळ : निजामुद्दीन हुबळी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या महिला प्रवासी सुरभी आदित्य त्रिपाठी यांचा 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला.
खंडवा पोलिसात गुन्हा वर्ग
हुबळी एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक ए -1 मधील 15 नंबरच्या सीटवर बसून त्रिपाठी या ग्वालियर ते भुसावळ प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्रिपाठी यांचा झोपेचा फायदा घेऊन इटारसी ते खंडवा दरम्यान 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा खंडवा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.








