महिलेच्या पर्समधून दोन लाखांचे दागिने लंपास : चोपडा बसस्थानकातील घटना


Jewels worth two lakhs stolen from woman’s purse : Incident at Chopra Bus Stand चोपडा : महिलेच्या पर्सची अलगद चैन उघडत भामट्याने शहरातील बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत दोन लाख 12 हजारांचे दागिने लंपास केले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा कसून शोध
रवींद्र मंगल पाटील (रा. वढोदा ता.चोपडा) हे आपल्या पत्नीसह मंगळवार, 14 रोजी दुपारी चार सुमारास चोपडा बस स्थानकात आले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रवींद्र पाटील यांच्या पत्नीच्या गळयात असलेल्या पर्सची चैन उघडत दोन लाख 12 हजारांचे दागिने लंपास केले. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !