दहावी-बारावी परीक्षेसाठी अखेर दहा मिनिटांची वेळ वाढवली


Finally ten minutes time was extended for class 10th-12th exam

मुंबई : दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.







निर्णय रद्द केल्याने व्यक्त झाली नाराजी
याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !