वाहनांच्या बॅटर्‍या चोरणार्‍या चौकडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Parola police arrested the accused who stole batteries पारोळा : दुचाकीसह ट्रॅक्टरची बॅटरी लांबवणार्‍या चौकडीला पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी पारोळा पोलिस ठाणे हद्दीत चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. अटकेतील आरोपींमध्ये एका भंगार विक्रेत्याचाही समावेश आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पारोळा तालुक्यातील राजवड आणि शेवाळे बुद्रुक या गावातील ट्रॅक्टरच्या सहा बॅट-या चोरी गेल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आरोपींना अटक
पारोळा पोलिसांनी देवेंद्र उर्फ मोठा शिवा नाईक (रा.राजीव गांधी नगर, पारोळा), महेंद्र उर्फ विकास उदीलाल मोरे (रा.शेळावे खुर्द), भिवसन उर्फ कमलेश मगन भिल (रा.शेळावे बु.॥), महेश संजय पाटील (रा.शेळावे खुर्द) यांना अटक केली आहे. पारोळा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !