जळगावातील तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू
A young man from Jalgaon died after being hit by a train जळगाव : शहरातील दिनकर नगरातील 26 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. नारायण शरद पवार (26, दिनकर नगर, जळगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रेल्वेचा धक्का बसताच मृत्यू
नारायण पवार हा तरुण नाशिक येथे औषध विक्रीच्या दुकानावर कामास होता व कुटुंबियांना भेटण्यासाठी तो दोन दिवसांपूर्वीच आला होता. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जळगाव-आसोदा दरम्यानच्या रेल्वे रुळावर अपलाईनवरील रेल्वे खांबा क्रमांक 422-16 रेल्वे रूळ ओलांडताना कुठल्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. खिश्यातील कागदपत्रांच्या आधारे मयताची ओळख पटली. सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गंगावणे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. बुधवारी शवविच्छेदनाअंती मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत तरुणाच्या पश्चात आई अनिता, बहिण पूनम आणि वडील शरद रामदास पवार असा परीवार आहे.

