ध्वज पूजनाने चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवाला सुरूवात


मुक्ताईनगर : श्री  संत मुक्ताबाई समाधीस्थळ, मुक्ताईनगर व चांगदेवगावी परंपरेने योगीराज चांगदेव-मुक्ताबाई या गुरु शिष्यांच्या भेटींच्या अभूतपूर्व पर्वावर

संत चांगदेव मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवाला मंगळवारपासून ध्वजपूजनाने सुरूवात झाली.
पासून सुरू झाली. 20 फेब्रुवारी पर्यंत चालणार्‍या यात्रा उत्सवात दिंड्यासह आठ ते दहा लाख वारकरी उपस्थिती देतील, असा अंदाज आहे.







दहा लाख भाविक येण्याचा अंदाज
संत मुक्ताबाई संस्थांनचे मानकरी अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी पादुका पूजन व ध्वज पूजन करून सोहळ्याला सुरुवात केली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, हभप रतीराम महाराज शास्त्री, अनिल पाटील व भाविक, वारकरी मंडळी उपस्थित होती. यंदा दहा लाख भाविक येण्याचा अंदाज असून या दृष्टीने प्रशासनाने भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

एक हजार स्वयंसेवकांची नोंदणी
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कामे करण्यात आली आहेत. जुन्या मंदिरात ब्लॉक बसवण्यासह दर्शन बारी रॅम करण्याचे कामे करण्यात आल्याने भाविकांना एकेरी मार्गाने दर्शनास जाऊन बाहेर पडता येणार आहे त्यामुळे यावर्षी दिंड्या पालख्यांना मूळ मंदिरातील आतील भागातुनच प्रदक्षिणा करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता प्रथमच एक हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक सेवाधारी त्यांच्या माध्यमातून विविध कमिट्यांची स्थापना करण्यात आलेी आहे. एकादशी व महाशिवरात्री दोन्ही दिवशी गर्दीची संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !