मुक्ताईनगरात दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिराला प्रतिसाद

खासदारांनी साधला संवाद : कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी नोंदणी


मुक्ताईनगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने रावेर लोकसभा क्षेत्रात मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित शिबिरात खासदार रक्षा खडसे यांनी दिव्यांग बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणल्या व शिबिराची माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
शिबिराला बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष डी.एच.चव्हाण, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस संतोष खोरखेडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राहुल राणे, दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, शहराध्यक्ष पंकज कोळी, कैलास वंजारी, प्रशांत महाजन, राजेंद्र सावळे, मोहन महाजन, नायब तहसीलदार निकेतन वाडे, नायब तहसीलदार झांबरे, समाजकल्याण अधिकारी गणेशकार, गटविकास अधिकारी हेमंत काठीपुरी, डॉ.योगेश राणे, डॉ.प्रशांत कांबळे, डॉ.गोपाळ पांढरे, डॉ.एहसान खान, डॉ.प्रताप राठोड, डॉ.भूषण दैवे, डॉ.कृष्णा सुर्वे तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !