भुसावळातील गोलाणी कॉम्लेक्समध्ये घरफोडी : 35 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Golani Comlex in Bhusawal : 35 thousand in lieu of compensation भुसावळ : शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी घरफोडी करीत 35 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
संजय एकनाथ गोसावी (56, लहान हनुमान मंदिराजवळ, गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ) यांच्या बंद घरातून 13 ते 14 रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करीत 20 हजारांची रोकड, तीन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, तीन हजार रुपये किंमतीची सोन्याची वाटी, नऊ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे आदी 35 हजारांचा ऐवज लंपास केला. चोरी प्रकार लक्षात आल्यानंतर गोसावी यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास एएसआय सत्तार शेख करीत आहेत.








