उटखेडा येथील अल्पवयीन मुलीस पळवले
A minor girl from Utkheda was abducted रावेर : तालुक्यातील उटखेटडा येथून अल्पवयीन पळवून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
बर्हाणपूर जिल्ह्यातील गरीब कुटुंब रोजगारानिमित्त उटखेडा येथे वास्तव्यास असून या कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने गुरुवार, 9 रोजी सकाळी आठ वाजता काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या पित्याने रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.








