भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’ मानांकन

पत्रकार परीषदेत अध्यक्ष मोहन फालक यांची माहिती


Nahata College in Bhusawal has got ‘A’ rating from NAAC भुसावळ : शहरातील ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला विज्ञान आणि पु, ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’ म ानांकन मिळाले असल्याची माहिती ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक यांनी पत्रकार परीषदेत बुधवारी दुपारी दिली. फालक म्हणाले की, सलग चौथ्यांदा ‘अ’ मानांकन पटकावणारे उमवि कार्यक्षेत्रात केवळ नाहाटा महाविद्यालय असून ही भुसावळसाठी गौरवास्पद बाब आहे.

अन्य महाविद्यालये करणार आता नाहाटाचा अभ्यास
मोहन फालक म्हणाले की, जी महाविद्यालये यापुढे नॅक मानांकन करणार नाही त्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना यापुढे पगार अदा करण्यात येणार नाही. उमवि कार्यक्षेत्रातील 146 पैकी 60 महाविद्यालये नॅकला सामोरे गेले असून त्यात महाविद्यालयाला अ मानांकन प्राप्त झाले आहे. भुसावळकरांठी ही निश्चितच गौरवास्पद बाब असून अन्य महाविद्यालयांना आता ‘अ’ मानांकनाबाबत नाहाटा महाविद्यालयाचा अभ्यास करता येईल.







कमेटीकडून विविध विभागांची पाहणी
नाहाटा महाविद्यालयाला 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी बंग्लोरच्या नॅक कमेटीतील अध्यक्ष डॉ.राज सिंग (कुलगुरु जैन विद्यापीठ बंगलोर), डॉ.शालिनी सिंग (प्राध्यापक एम.डी.यु.रोहतक) आणि डॉ.रवींद्र कुमार (प्राचार्य, गोंडा महाविद्यालय उत्तरप्रदेश) यांनी भेट दिली व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आयक्यूसी या विभागांना भेटी देऊन मुल्यमापन केले त्यानंतर माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी यांच्या स्वतंत्रा सभा घेतल्या व महाविद्यालयाविषयी हितगुज केल्याचे पत्रकार परीषदेत मान्यवरांनी सांगितले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कार्यालय अधीक्षक भगवान तायडे, प्रा.प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !