भुसावळातील शासकीय आयटीआयमध्ये चोरी : 33 हजारांचे साहित्य लंपास
Theft in Government ITI in Bhusawal : Materials worth 33 thousand looted भुसावळ : शहरातील शासकीय आयटीआयमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कातारी विभागात झाली चोरी
चोरट्यांनी आयटीआयमधील कातारी विभागातील कपाटातून विविध प्रकारचा 33 हजार 200 रुपयांचा सामान लांबवला. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी उघडकीस आल्यानंतर नियमित गट निर्देशक मुकेश पाटील यांना तक्रार देण्यास सांगूनही त्यांनी तक्रार न दिल्याने सुरक्षा अधिकारी हरीश कुमार एकनाथ पाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल अन्वर शेख करीत आहेत.








