भुसावळातील अपार्टमेंटमधून महागड्या 19 हजारांच्या सायकली लंपास


Expensive bicycles worth 19,000 stolen from an apartment in Bhusawal भुसावळ : शहरातील पंधरा बंगला भागातील रीद्धी हाईटस या अपार्टमेंटच्या आवारातून चोरट्यांनी 19 हजार रुपये किंमतीच्या दोन महागड्या सायकली लांबवल्या. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
नरेंद्र प्रकाश पवार यांच्या तक्रारीनुसार, अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी 16 हजार 660 रुपये किंमतीची महागडी सायकल चोरट्यांनी लांबवली तसेच कैलास ललवाणी यांचीदेखील अडीच हजार रुपये किंमतीची रेसर सायकल लांबवण्यात आली. तपास हवालदार राजेश पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !