बामणोदला रसवंती दुकानाला आग : साडेचार लाखांचे नुकसान


Bamanodla Raswanti shop fire: loss of four and a half lakhs यावल : तालुक्यातील बामणोद शिवारात फैजपूर-भुसावळ रस्त्यावर असलेल्या रसवंती दुकानाला मध्यरात्री आग लागल्याने चार लाख 69 हजारांचे साहित्य जळुन खाक झाले. याबाबत फैजपूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

मध्यरात्री लागली आग
बामणोद शिवारात फैजपूर-भुसावळ रस्त्यालगत प्रमोद भास्कर कोळी (पाडळसा, ता.यावल) यांचे रसवंतीचे दुकान आहे. हे दुकान विमलबाई भास्कर कोळी यांच्या शेत गट क्रमांक 520 मध्ये आहे. या दुकानात मध्यरात्री अचानक इलेक्ट्रीक शॉटसर्कीटमुळे आग लागल्याने 12 एमएम ठिबकच्या नळ्याचे बंडल, दोन इंची पी.व्ही.सी.पाईप, प्लॉस्टीक खुर्ची, फ्रिज, शेतीचे इतर अवजारे व साहित्य मिळून एकूण चार लाख 69 हजार 500 रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. हा प्रकार सकाळी निर्दशनास आला. याबाबत फैजपूर पोलिसात प्रमोद कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक उमेश सानप करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !