चाळीसगावातील औषध व्यावसायीकाचे पावणेतीन लाख लूटले


A drug dealer in Chalisgaon was robbed  चाळीसगाव : शहरातील औषध विक्रेत्याला चौघांनी धक्काबुक्की करीत लूटत दोन लाख 65 हजारांची रक्कम लांबवली. बुधवारी रात्री साडेआठ वाजता शांती नगरात घडल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाळत ठेवून लुटीचा संशय
शहरातील शांती नगरातील संजय हशमतराम मंदानी (44) हे व मेडिकल व्यवसाय करतात. बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ते उधारीची जमा केलेली दोन लाख 65 हजारांची रक्कम बॅगेत टाकून घराकडे दुचाकी (क्र.एम.एच. 19 डी.एल.7254) ने घराकडे निघाले असता घराजवळच दोन दुचाकीवरून आलेल्या चार संशयीतांनी दुचाकी अडवली तर अन्य संशयीतांनी धक्काबुक्की करीत मंदानी यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावत पळ काढला. चाळीसगाव शहर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घत पंचनामा केला. मंदानी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !