निमखेडीतील विवाहितेचा छळ : पतीविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Nimkhedi : Crime against husband जळगाव : माहेरून दोन लाख रुपये न आसणल्याने निमखेडी येथील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या पतीविरोधात बुधवार, 15 फेब्रुवारी रोजी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीविरोधात गुन्हा दाखल
निमखेडी येथील माहेर व वढोदा येथील सासर असललेया मनिषा संदीप जाधव यांचा पती संदीप आनंदा जाधव याने माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला व मागणी पूर्ण न झाल्याने पती संदीप याने मनिषा हिस वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच शारीरीक व मानसिक छळ केला. हा त्रास असह्य झाल्याने मनिषा जाधव हिने याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर बुधवारी संदीप जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !