वाकी रस्त्यावर दुचाकी अपघातात पाळधीतील प्रौढाचा मृत्यू


An adult in custody died in a two-wheeler accident on Waki road जामनेर : भरधाव दुचाकींमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात पाळधीतील प्रौढाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शहरातील वाकी रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी घडला. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

जागीच झाला मृत्यू
जामनेर शहरातील वाकीरोड वर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने सोपान आनंदा वाघ (44, पाळधी, ता.जामनेर) हे जागीच ठार झाले तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. जखमी झालेल्या दोघांना तातडीने जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !