धानवड तांडा येथे किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा


Beating up three people for a minor reason in Dhanwad Tanda : Crime against the quartet जळगाव : जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथे वादातून वेल्डींग कामगार तरुणासह त्याच्या दोन भावंडांना किरकोळ कारणावरून चौकडीने मारहाण केली. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून मारहाण
धानवड तांडा येथे पालू जालम चव्हाण (28) हा तरुण कुटुंबासह राहतो. बुधवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गावातहू पालू जालम चव्हाण याला उद्देशून गावातील राजकुवर किसन राठोड याच्यासह इतर तिघत्तंनी तुला मस्ती आल्याचे म्हटल्याने त्याचा जाब पालूने विचारताच राजकुवर याने पालू याच्या पोटावर तोंडावर काठीने मारहाण केली तर पालू याचा भाऊ शामराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे भांडण सोडविण्यासाठी आल्यानंतर त्यांना निलेश प्रभाकर राठोड, पोपट उखा राठोड व किसन उखा राठोड या तीन जणांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत तिघे भावंड जखमी झाले असून गुरुवारी राजकुवर राठोड, निलेश राठोड, पोपट राठोड, किसन राठोड यांच्याविरोधात जळागव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !