एकमेकांकडे पाहिल्याच्या वादातून जळगावात तरुणाला मारहाण


A young man was beaten up in Jalgaon due to a dispute over looking at each other  जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परीसरातील मच्छी बाजारात एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करण्या आली. ही घटना गुरुवार, 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात संशयित गणेश गवळी (तांबापूरा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील तांबापुरा परीसरातील मच्छीबाजारातील रहिवासी समीर मुस्तकीन बागवान (18) हा गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घराजवळ असतांना याठिकाणी तांबापुरा परीसरातील गणेश गवळी हा आला. समीरने त्याच्याकडे बघितल्याचा राग आल्याने गणेश गवळी याने समीर यास काही एक कारण नसतांना शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात समीर जखमी झाला आहे. या प्रकरणी समीर याने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश गवळी (पूर्ण नाव माहित नाही रा.गवळीवाडा, तांबापुरा) याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !