यावलला अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या तरूणाकडून मुलीच्या वडीलांना मारहाण
Girl’s father beaten up by youth chasing minor girl in Yawal यावल : यावल बसस्थानकासमोर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणार्या एका तरुणास पीडीत अल्पवयीन मुलीच्या पित्याने जाब विचारल्यानंतर उलट तरुणानेच पीडतेच्या वडिलांना मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
छेडखानीचे प्रकार वाढले
यावल पोलिस ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मागील गेल्या 15 दिवसांपूर्वी यावल बसस्थानकाबाहेर शहरातील आनंद बिर्हाडे हा तरुण पाठलाग करीत होता. गुरूवारी शाळेतून घरी येत असतांना त्याने मोबाईल क्रमांक मागितला त्यावेळी पीडीता तिथे न थांबता किराणा दुकानदार गेल्याने तरुण पळून गेला. घरी येवून अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितला व पुन्हा ती प्रॅक्टीकल परीक्षेसाठी शाळेत जात असताना बसस्थानकासमोर तो तरूण दिसला असता तिने फोनकरुन वडीलांना माहिती दिली व पीडीतेचे वडील यांनी या आनंद बिर्हाडे या मुलीची छेड का काढतो पाठलाग का करतो विचारणा केली असता त्याने थेट पीडीतच्या वडीलांना मारहाण केली व दुचाकी (एम.एच. 19 डी.झेड.9828) ही त्याठिकाणी सोडून पळ काढला. या प्रकरणी यावल पोलिसात बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.








