रीक्त पदे भरण्यासाठी बोदवडला तरुणाने अंगावर ओतले डिझेल
पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ :शहरात घटनेने उडाली खळबळ
Bodwadla youth poured diesel on himself to fill vacant posts बोदवड : शासकीय शहरातील शासकीय कार्यालयांमधील प्रभारीराज संपुष्टात यावे तसेच भूमी अभिलेख अधिकार्यांसह ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांचे पद भरावे, कायमस्वरुपी तहसीलदारांची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या प्रमोद धामोळे या तरुणाने शुक्रवारी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतल्याने शहरात खळबळ उडाली तर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
शहरात सर्वत्र सुरू आहे प्रभारीराज
बोदवड हे तालुक्याचे गाव असलेतरी तहसील कार्यालयात नऊ महिन्यांपासून तहसीलदार पद रीक्त आहे तर वैद्यकीय अधिकारी पद ही गेल्या तीन-चार महिन्यांपासून रीक्त असल्याने कामे घेवून येणार्या नागरकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय रीक्त पदे भरण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तसेच शासनाने लक्ष द्यावे या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी प्रमोद धामोळे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले मात्र पुढील अप्रिय घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी धाव घेत तरुणाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तरुणाची समजूत यावेळी काढण्यात आली. दरम्यान, रक्त पदासाठी तरुणाने घेतलेल्या पावित्र्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे.

